यावल । शिवसेना हा शेतकरी व सर्वसामान्यांचा पक्ष असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वानुसार राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व दिले जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तळागाळातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केले. तालुक्यातील चुंचाळे येथील महादेव नगरमध्ये युवासेनेच्या शाखेचे उद्घाटन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवासेना जिल्हा संघटक हभप जळकेकर महाराज हे होते. ते म्हणाले की, गाव कोणतेही असो प्रत्येक गावाचा विकास करणारा पक्ष म्हणजे शिवसेना, पवित्र असा हा भगवा ध्वज तुम्ही आज परीधान केलेला आहे तरी युवा सेनेच्या माध्यमातून गावाचा विकास करुन घ्या, असे त्यांनी सांगितले.
चुंचाळे परिसरात युवासेना शाखेचे उद्घाटन
प्रमुख पाहूणे म्हणून आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, युवा जिल्हा अधिकारी अविनाश पाटील, जिल्हा युवा संघटक जळकेकर महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण साळुखे, शिवसेना तालुका प्रमुख पाटील, उपतालुकाप्रमुख विनायक आप्पा, युवासेना तालुकाध्यक्ष प्रवीण सोनवणे, तालुका संघटक गोपाळ चौधरी, चुंचाळे माजी विकासो चेअरमन सुनिल नेवे, शरद कोळी यावल, नायगाव सरपंच एल.व्ही. पाटील, अरुण पाटील गिरडगाव, योगेश पाटील, गोटु सोनवणे, भाऊसाहेब धनगर, नाना पवार, रवी सोनवणे, परिसरातील युवा सैनिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चुंचाळे युवासेना शाखा प्रमुख लिलाधर धनगर, उपप्रमुख अमोल कोळी, सचिव योगेश पाटील, सदस्य सुधाकर कोळी, आण्णा राजपुत, किरण पाटील, मनोज धनगर, उमेश राजपुत, सागर राजपुत, नाना पाटील, विकास कोळी, प्रविण कुंभार यांनी परिश्रम घेतले. यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रशेखर साळुंखे यांनी केले तर आभार सुधाकर कोळी यांनी मानले.