शिवस्मारकाला विरोध करणार्‍यालाच केले सवाल

0

मुंबई । अरबी समुद्रात होणार्‍या शिवस्मारकाविरोधी याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी फटकारले आहे. हैदराबाद आणि तामिळनाडूला पुतळे उभारणे परवडू शकते मग महाराष्ट्राला काय कमी आहे? या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या मूख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांनी शिव स्मारकाला विरोध करणार्‍या याचिकार्त्याला समज दिली. तसेच या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

जलपूजन ही स्टंटबाजी
शिवस्मारकाविरोधी याचिका दाखल करणार्‍या याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाने विचारले की, तुम्ही कन्याकुमारी इथला पुतळा पाहिलाय का? तुम्ही हुसैन सागर पाहिलंय का? त्यांना जमू शकत तर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थती नक्कीच चांगली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अरबी समुद्रातील शिव स्मारकाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला विरोध करणारी जनहित याचिका मोहन भिडे यांनी दाखल केली आहे. व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटन्ट असलेले भिडे कपासी या नावाजलेल्या कोचिंग क्लासमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

जलपुजन म्हणजेच स्टंटबाजी
भिडे यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांना नितांत आदर आहे. मात्र जनतेने टॅक्सरुपी भरलेल्या पैश्याची अशाप्रकारे उधळण करणे चुकीचे आहे. राज्य सरकारने घातलेला हा शिवस्मारकाचा घाट आणि जलपूजन म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर केलेली स्टंटबाजी आहे, एखाद्या स्मारकावर 3600 कोटी खर्च करणे चुकीच आहे, असा दावा त्यांनी केला आहे.