शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी जाणारी बोट बुडाली; कार्यक्रम रद्द

0

मुंबई- अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे खऱ्या अर्थाने आजपासून बांधकाम सुरु होणार होते. यासाठी आज पायाभरणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पायाभरणी कार्यक्रमाला जाणारी स्पीड बोट खडकावर आपटून बुडाल्याची घटना घडली आहे. यात २५ जण होते. अपघात झाल्याने पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

याबोटीत प्रधान सचिव यांच्यासह अनेक पदाधिकारी होते. सर्वांना वेळीच बाहेर काढण्यात आले आहे, त्यामुळे सार्वजण सुखरूप आहे अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी दिली आहे.