शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव: शवाजीनगरातील मॉर्निक वॉक करणार्या नागरिकांनी अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारे वाहन शुक्रवारी पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. या वाहनात तीन गुरे कोंबून कत्तलीसाठी घेवून जात असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी गुरांसह वाहन जप्त करण्यात आले असून चालक मयुद्दीन इसुफ पठाण वय 35 रा. उस्मानिया पार्क, शिवाजीनगर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुरांचा आवाज आल्याने दोघांना आला संशय
याबाबत माहिती अशी की, कांचन नगर येथील रहिवासी राजेंद्र देविदास नन्नवरे वय 31 आणि समाधान गुलाब पाटील यांचा फुले मार्केटमध्ये कपडे विक्रीचा व्यवसाय करतात. हे दोघे दररोज सकाळी कांचन नगर ते दुध फेडरेशन मॉर्निक वॉकसाठी जात असतात. 28 रोजी पहाटे 5 वाजता नन्नवरे व समाधान पाटील हे दोघेही नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते. दूधफेडेशनकडून पुन्हा शिवाजीनगरकडे परत येत असतांना त्यांना चारचाकी (एम.एच12 जेएफ 1295) दिसली. यात वाहनातून गुरांचा आवाज आल्याने दोघांना संशय आला. त्यावरुन गाडी थांबवून त्याची चौकशी तसेच पाहणी केली असता चारचाकीत दोन बैल व एक गाय निर्दयीपणे कोंबली असल्याचे दिसून आले. चालकास विचारपुस केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. वाहनांची वाहतूक करण्याबाबत कोणतेही कागदपत्र आणि गाडीचे देखील कागदपत्र उपलब्ध नसल्याने त्यास चारचाकी व गुरांसह शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
चालकांसह गुरे मालक पोलिसांच्या ताब्यात
याप्रकरणी राजेंद्र नन्नवरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 30 हजार रुपये किमतीचे दोन बैल, 20 हजार रुपये किमतीची गाय, दील लाख रुपयांची चारचाकी असा एकूण 2 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. चालक मयुद्दीन इसुफ पठाण, व गुरे मालक संजू बिस्मिल्ला पटेल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.