शिवाजीनगरात पिकअप व्हॅनची बसला धडक

0

जळगाव । मुमुराबादकडे जाणार्‍या एसटी महामंडळाच्या बसला शिवाजी नगरात दुपारी 12 वाजेच्या सुमारास केटरींग व्यावसायकीच्या पिकअप व्हॅनने मागून धडक दिली. त्यात बसच्या मागील बाजूचे नुकसान झाले. मात्र, पिकअ‍ॅप व्हॅनच्या मालकाने नुकसान भरपाई देण्याची कबूली दिल्यानंतर या प्रकरणी शहरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगाराची बस (क्र. एमएच07-सी-7439) गुरूवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भोकरकडे जात होती.

त्यावेळी शिवाजीनगरात मागून भरधाव आलेल्या पिकअप व्हॅनने (क्र. एमएच-42-बी-4560) बसला जोरदार धडक दिली. मात्र पिकअप व्हॅन मालकाने नुकसान भरपाई देण्याचे कबुल केल्यानंतर वादावर पडला पडला. त्यामुळे याबाबत पोलिसात नोंद नाही.