चार महिन्यांपूर्वीही एका म्हशीचा मृत्यू ; तक्रार करुन महावितरण विभाग दखल घेईना
जळगाव : म्हशी चरत असताना जमिनीलगत लोंबकळत असलेल्या विद्युतप्रवाहाच्या तारेत अडकून दोन म्हशी जागीच दगाल्याची घटना रविवारी दुपारी शिवाजीउद्यानजवळील जे.के.पार्क परिसरात रविवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली. चार महिन्यापूर्वी याच परिसरात एका म्हशीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. तक्रार करून देखील महावितरणविभागाने दखल न घेतल्या महावितरणच्या नाकर्तेपणातून दोन म्हशी दगावल्याची संतप्त प्रतिक्रिया नाना सजन हटकर (60) रा. तांबापूरा यांच्यासह इतरांनी व्यक्त केल्या.
म्हशींना चारणार्या व्यक्तीलाही विजेचा धक्का
नेहमीप्रमाणे रविववारी खंडू बाबूराव हटकर हे म्हशी घेऊन जे.के.पार्क परिसरात चारत होते. इलेक्ट्रीक पोलजवळ जमिनीलगत लोंबकळत असलेल्या तारेत अडकून दोन्ही म्हशी कोसळल्या. हा प्रकार लक्षात आल्याने खंडू हटकर म्हशी वाचविण्यासाठी गेले असता विजेचा शॉक लागून ते बाजूला फेकले गेले. त्यानंतर काही वेळातच जागेवर म्हशी दगावल्या. घटना कळाल्यानंतर मेहरूण तसेच तांबापूर येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दगावलेल्या दोन पैकी एक म्हशी गाभण होती.
महिलेला अश्रू अनावर झाले.
गाभण असलेल्या दगावलेल्या म्हशीला पाहताच महिलेला अश्रू अनावर महावितरण कर्मचार्यांना वारंवार तक्रार करून देखील या लोंबकळत असलेल्या तारेबाबत कोणतीही कारवाई केली नाही. त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच दोन म्हशींचा जीव गेला, असे सांगत महिलेस अश्रू अनावर झाले. याच परिसरात चार महिन्यापूर्वी आबा नाना हटकर यांच्या मालकीची म्हैस विजेच्या धक्क्याने दगावली होती.
महावितरण विभाग जीवावर उठला?
चार महिन्यापूर्वी लोबंकळत असलेल्या विजेच्या तारेबददल महावितरण कार्यालयातकडे तक्रार केली असता ती आमची हदद नाही,असे सांगून कर्मचारी तसेच अधिकार्यांनी कानावर हात ठेऊन कोणतीही दखल घेतली नव्हती, असा आरोप आबा हटकर यांनी केला. आज दोन म्हशी गेल्या. माणसांचा जीव गेला असता तर? असा सवाल करत त्यांनी महावितरणच्या नाकर्तेपणावर संताप व्यक्त केला.