शिवाजीनगरात सापडलेल्या अनोळखी वृध्दाचा मृत्यू

0

जळगाव । शिवाजीनगर हुडको परिसरातील शेतात एक अनोळखी वृध्द जमखी अवस्थेत मिळून आल्यानंतर रहिवाश्यांनी त्यास जिल्हा सामान्य रूग्णालयात बुधवारी सकाळी दाखल केले. दरम्यान, उपचार घेत असतांना 11.40 वाजेच्या सुमारास त्या अनोळखी वृध्दाचा मृत्यू झाला. शिवाजीनगर हुडको परिसरातील एका शेतात 65 ते 70 वयोगटातील अनोळखी वृध्द इसम फिरोज पिंजारी यांना बुधवारी सकाळी मिळून आला. त्यानंतर त्यांनी त्यास जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतू सकाळी 11.40 वाजेच्या सुमारास उपचार घेत असतांना त्या अनोळखी वृध्दाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सीएमओ आसीफ शेख यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पूढील तपास सहाय्यक फौजदार करीम शेख करीत आहेत.