जळगाव । मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळील सावित्री नदीवर नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन 5 जूनला होणार आहे. गेल्यावर्षी 3 ऑगस्ट रोजी सावित्री नदीवरील कालबाह्य पुलासह एसटी महामंडळाच्या दोन बस आणि खासगी वाहने वाहून गेली होती. सावित्री नदीवरील दुर्घटनेची पुनावृत्ती होवू नये यासाठी शहरातील शिवाजी नगर पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली होती. दरम्यान, शिवाजी नगर पुलासाठी 20 कोटी रूपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. महानगर पालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने हा खर्च पेलू शकणार नसल्याने शिवाजी नगर पुलाचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. या पुलाच्या बांधकामविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्व मंत्री सुरेश प्रभु यांनी आयुक्त जीवन सोनवणे यांच्यासोबत व्हिडीओकॉन्फसरिंगद्वारे 18 एप्रिल रोजी चर्चा केली. मुख्यमंत्री यांच्या वर्षा या निवास्थानातून रेल्वे मंत्री सुरेश प्रभू व फडणवीस यांनी आयुक्तांशी सपंर्क साधला. या चर्चत आयुक्तांनी पुलाची सद्य स्थिती सांगून रेल्वे अधिकार्यांनी पुल बांधून देण्याची तयारी दाखविली असल्याचे निदर्शनास आणून दिले. शिवाजी नगर पुल 100 जुना झाल्याने कालबाह्य झाले असल्याचे आयुक्तांनी व्हिसीमध्ये सांगितले.
आमदार सुरेश भोळे यांनी केला पाठपुरावा
शिवाजीनगर उड्डाण पुलाचे बांधकाम नव्याने करण्यासाठी केंद्र शासनाकडून निम्मे अर्थ सहाय्य करण्यात येत असून 50 टक्के रक्कम राज्य शासनाने द्यावी, अशी मागणी आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम तथा जळगाव पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडे मंगळवारी केली आहे. जळगाव शहरातून जात असलेल्या शिवाजीनगर पुलाची अतिशय दूरवस्था झाली आहे.
50-50 टक्के हिस्सा केला मान्य
आयुक्त जीवन सोनवणे यांनी यांनी मुख्यमंत्री व रेल्वे मंत्र्यांना महानगन पालिकेची पुल उभारण्याची आर्थिक क्षमता नसल्याचे स्पष्ट करत रेल्वेने व राज्य शासनाने पुला उभारणीसाठी येणारा खर्च उचलावा अशी मागणी केली. याला मुख्यमंत्र्यानी व रेल्वे मंत्र्यांनी 50-50 टक्के हिस्सा उभारण्याचे मान्य केले. शिवाजी नगर पुलाचे बांधकामास 103 वर्षे उलटून गेले असून तो मोडकळीस आला आहे. हा पुल दुरूस्त करावा किंवा नवीन तयार करावा यासंदर्भांत नागरिकांनी मागणी केली होती. मध्य रेल्वे मार्गावर शिवाजी नगर उड्डाण पुलाचे बांधकाम ब्रिटीशांनी 1913 साली केले आहे. या बांधकामास 103 वर्ष पूर्ण होत आहेत. या पुलाला 100 वर्ष पूर्ण झाल्याने या पुलाची आयुष्य मर्यादा संपली आहे. हा पुल केव्हाही कोसळू शकतो. तसेच यातून जीवितहानी होवू शकते असे ब्रिटिश सरकारने रेल्वे प्रशासनाला पत्राद्वारे आठवण करून दिली आहे.
वाहतूकीचा मार्ग होणार मोकळा
शहरातून जाणार्या रेल्वे मार्गामुळे शिवाजीनगर गेंदालाल मिल परिसर, दाळफळ परिसर हा रेल्वे मार्गाच्या उत्तरेकडील भाग, पिंप्राळा परिसर, मुक्ताईनगर, प्रेम नगर, भोईटे नगर, निमखेडी परिसर हा अतिशय मोठा परिसर रेल्वे मार्गाच्या पलिकडे असलेला भाग आहे. शहरात दळणवळण करणारी बरीच वाहतूक पिंप्राळा रेल्वे गेटकडून शिवाजी नगर पुलाकडे होत असते. हा पुला पुन्हा तयार झाल्याने नागरिकांची मोठी वाहतुकीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. हा पुल कालबाह्य झाल्याने मोडकळीस आलेला आहे. यावर जड वाहनांची वर्दळ थांबविण्यात आलेली आहे. रेल्वेतर्फे येथे क्रॉस बार लावण्यात आले आहेत.