जळगाव: शिवाजीनगर रेल्वे पुलाचा सांगाड उचलण्यासाठी आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वेचे सांगाडे उचलण्यासाठी महाबली क्रेन दाखल झाली आहे. शिवाजीनगर रेल्वे पूल पडण्यासाठी काम काही दिवसांपासून सुरु आहे. बहुतांश भाग पडला गेला आहे. उर्वरित कामासाठी आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सांगाडे उचलण्यासाठी महाबली क्रेन आणण्यात आली आहे. ही क्रेन इतर क्रेन पेक्षा अनेक पटीने मोठी आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात लोखंडी सांगाडे उचलण्यात येणार आहे.