जळगाव । शहरातील प्रमुख स्मशानभूमीपैकी शिवाजीनगर स्थित स्मशानभुमीतील असुविधांबाबत नागरीकांकडून तक्रारी वारंवार येत होत्या. त्यावर उपाय म्हणुन स्मशान भुमीचे सुशोभिकरणासह विकास करण्यासाठी महापौर ललित कोल्हे यांच्या लोकसहभागातुन करण्याचा प्रयत्न करण्यात यश आले. शुक्रवारी 5 रोजी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आलेले आहे. रेमंड कंपनीतर्फे स्मशानभुमी सुशोभिकरणांतंर्गत दोन नविन ओटे बनविणे, सर्व ओट्यांना लोखंडी जाळ्या बसविणे, तारांचे कुंपन आदी संबंधीत कामे करण्यात येणार असुन याकामी सुमारे दहा लाखांचा खर्च येणार आहे.कामे झाल्यानंतर स्मशानभूमीचे रुपडे पालटणार आहे. नागरिकांमध्ये समधानाचे वातावरण आहे.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी सुरेशदादा जैन यांच्यासह महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, विरोधीपक्ष नेता वामनदादा खडके, माजी महापौर नितिन लढ्ढा, माजी उपमहापौर सुनिल महाजन, नगरसेवक अनंत जोशी, रविंद्र मोरे, अजय पाटील, सुरेश पाटील, चेतन शिरसाळे, नवनाथ दारकुंडे, जितेंद्र मुंदडा, गायत्री शिंदे, अप्पर आयुक्त राजेश कानडे, शहर अभियंता दाभाडे, अभियंता उदय पाटील, सुनिल तायडे, संजय नेमाडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर बाविस्कर, अमोल सांगोरे, उत्तम शिंदे, गोपाल पंडीत तसेच रेमंड कंपनीचे संजय बोखारे, दिलीपजी गायकवाड, शिवाजी दाभाडे, प्रविण सिंगजी, अवधूत पाटील, राकेशजी कोल्हे, कमलाकर महाजन, भैय्या पाटील, अनिल पाटील, सुनिल चौधरी आदी उपस्थित होते.