जळगाव – शहराच्या दोन्ही बाजूंना जोडणार्या शिवाजी नगरच्या पूलाचे काम गेल्या 3 वर्षांपासून पूर्ण होत नाहीये.यामुळे नागरिकांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे. यासाठी संबंधित ठेकेदाराकडून दंड वसूल केला गेला पाहिजे असे मत खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केले.
शिवाजी नगर पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून पासून रखडलेले आहे. यामुळे जनतेकडून रोष व्यक्त केला जात आहे. मात्र जनतेला यामध्ये झालेल्या तांत्रिक चुकांची कोणतीही कल्पना नसल्याने जनता थेट लोकप्रतिनिधींवर बोट उचलत आहे. शिवाजीनगर पुलाच्या बांधणे वेळी पुलाचा आराखडा चुकीचा बनवला गेला ज्यामध्ये कित्येक त्रुटी होत्या. यामुळे हा पूल अजून पर्यंत पूर्ण झालेला नाही. तर दुसरीकडे या त्रुटींमुळे मला स्वतःला खासदार म्हणून शिकायला मिळाले असून पिंपराळा पुलाच्या बांधकामा वेळी कोणतीही त्रुटी राहू नये याबद्दल मी स्वतः लक्ष घालणार आहे. असे वेळी खा. पाटील म्हणले तर पिंपळा पूल लवकरात लवकर बनेल याकडे मी स्वतः लक्ष देणार असल्याचेही यांनी सांगितले.
युटीलिटीची कामे पूर्ण झाली नाही.
शिवाजीनगर पूल बनवताना त्यामध्ये खूप त्रुटी होत्या मात्र ज्या मधील सर्वात मोठी त्रुटी म्हणजे
कोणत्याही युटीलिटीची कामे पूर्ण करण्यात आलेली नव्हती. पोल शिफ्टींगची कामे, रेल्वे अंतर्गत येणारी कामे, भूसंपादनाची कामे, व इतर कामांचा यामध्ये समावेश होता. कोरोना काळात जळगाव शहरातील हायवेचे कामे पूर्ण झाली मात्र शिवाजीनगरचा पूल पूर्ण होऊ न शकल्यचे हे सर्वात मोठे आणि गंभीर कारण आहे.
संबंधित विभागाकडे मागितली ’टिपणी’
शिवाजीनगर पुला मध्ये कोण कोणत्या चुका झाल्या आहेत व त्या चुका इतर कामांमध्ये होतो त्यासाठी मी संबंधित विभागांना टिपणी मागून घेतली आहे. यामुळे इतर ठिकाणी या चुका होणार नाहीत याची दक्षता माझ्याकडं घेतली जाणार आहे असे यावेळी खा. पाटील म्हणाले
ते उत्तर सोयीस्करपणे टाळले
जळगाव शहराच्या जोडणारा शिवाजी नगर चा पूल नक्की कधी पूर्ण होईल याबाबत खासदार उमेश पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ह्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर दिले नाही. तर दुसरीकडे इतर सर्व बाबीं बद्दल माहिती दिली मात्र या प्रश्नाचे उत्तर द्यायला त्यांनी सोयीस्करपणे टाळाटाळ केली.
नवाब नव्हे, दाऊदचा गुलाम!
महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये नवाबाचा मुखवटा घेऊन वावरणारा मलिक नावाचा मंत्री प्रत्यक्षात मात्र, कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि देशद्रोही दाऊद इब्राहीमचा गुलाम असल्याचे ईडीच्या आरोपपत्रातंतून स्पष्ट होत असतानाही संपूर्ण ठाकरे सरकार त्या मंत्र्याच्या सरबराईसाठी जीव तोडून सज्ज झाले आहे. देशद्रोही दाऊदच्या हस्तकाची पाठराखण करणारे ठाकरे सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या जिवाशी खेळत असून दाऊदच्या हातचे बाहुले झाले आहे. सत्तेच्या सुरक्षेसाठी जनतेच्या सुरक्षेला मूठमाती देण्याचा खेळ ठाकरे सरकारने ताबडतोब थांबवावा आणि दाऊदचा हस्तक नवाब मलिकची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून महाराष्ट्र वाचवावा अशी मागणी खासदार पाटील यांनी यावेळी केली