शिवाजी नगराजवळ चाकू लावत एकाला लूटले

जळगाव : दुचाकी अडवत चाकूचा धाक दाखवत 43 वर्षीय प्रौढास लुटण्यात आल्याची घटना शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीच्या गेट समोर शुक्रवारी रात्री आठ वाजता घडली. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

टोळक्याविरोधात गुन्हा
योगेश परमानंद सोनी (43, रा.महावीर नगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ते सुवर्ण कारागीर आहेत. शुक्रवार, 8 जुलै रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास ते त्यांची दुचाकी घेऊन शिवाजीनगर परीसरातील स्मशानभूमीच्या गेट समोरून जात असताना एका तरुणाने त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून दुसरा आरोपी आल्यानंतर त्याने मिरचीची पावडर योगेश सोनीच्या डोळ्यात टाकली आणि झटापट झाली. यामध्ये योगेश सोनीच्या हातातील बॅग, मोबाईल आणि रोकड असा एकूण 22 हजार 260 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवण्यात आला. या प्रकरणी योगेश परमानंद सोनी यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात आज्ञात तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.