जळगाव – शिवाजी नगरात राहणाऱ्या 40 वर्षीय व्यक्ती घरातून कामावर जातो असे सांगून गेले. मात्र कामावरून घरी न आल्याने शहर पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेंद्र रामदास नवघने (वय- 40) रा. पार्वती निवास, शिवाजी नगर हे 4 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 कामावर जातो असे सांगून घरातून निघून गेले. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांचा इतरत्र शोध घेतला. ते मिळून न आल्याने उल्हास रामचंद्र नवघने यांच्या खबरीवरून शहर पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरेश पाटील करीत आहे.