शिवाजी नगरात किरकोळ कारणावरून एकावर चाकू हल्ला

0

जळगाव। किरकोळ कारणावरून दोघांमध्ये हाणामारी होवून एकाने दुसर्‍यावर दुसर्‍यावर चाकु हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी 12 वाजता शिवाजी नगरत येथे घडली. याप्रकरणी दोन्ही तरूणांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात परस्परविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद पुंडलिक सोनवणे यांच्या फिर्यादीप्रमाणे, अरविंद हे मित्र बंटी जाधव, गोपाल माळी यांच्यासोब शिवाजीनगरात गप्पा मारत उभे असतांना त्या ठिकाणी कमलाकर भिकन कोळी हा तरूण देखील त्या ठिकाणी उभा होता.

दरम्यान, कमलाकर हा टोमणे मारत असल्याने अरविंद आणि कमलाकर यांच्या बोलाबाली होवून वाद सुरू झाला. यानंतर कमलाकर याने अरविंद यास मारहाण करून चाकुने वार केला. यात अरविंद यांना पाठील लागले. दरम्यान, मंगळवारी अरविंद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात कमलाकर कोळी याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कमलाकर कोळी यांच्या फिर्यादीवरून पत्ते खेळतांना झालेल्या वादातून अरविंद सोनवणे व अजय सोनवणे या दोघांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी मारहाण करणार्‍या दोघांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे दोघांकडून देण्यात आलेल्या तक्रारीवरून परस्परविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.