मुंबई । नाट्यकर्मींची पंढरी म्हणून ओळखले जात असलेले दादर येथील सुप्रसिद्ध शिवाजी मंदिर नाट्यमंदिर अर्थात श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळा (ट्रस्ट) या संस्थेच्या अध्यक्षपदी शिक्षण महर्षी प्रतापराव तथा आबासाहेब तोरसकर यांची निवड झाली आहे. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात, गोवा मुक्ती लढा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान दिलेले तोरसकर गेली 50 वर्षे संस्थेत विविध पदांवर सक्रीय आहेत.तोरसकर यांचा नाट्यक्षेत्राशी संबंधित कलावंत, साहित्य, राजकारण आणि शिक्षणक्षेत्राशी घनिष्ट संबंध आहेत.
यातील अनेक दिग्गजांशी त्यांचे कौटुंबिक नातेसंबंध आहेत. शिक्षण क्षेत्रात अनेक नामवंत शिक्षणसंस्थांचा भारही ते सांभाळत आहेत. शिक्षण महर्षि, शिक्षण भूषण, सिंधू रत्न, पर्यावरण प्रेम अशा अनेक सन्मानाने त्यांना गौरवण्यात आले आहे.