भुसावळ। छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते. त्यांनी आपल्या जनतेच्या हितासाठी आयुष्यभर कष्ट उचलून स्वराज्याची स्थापना केली. तसेच त्यांच्या सैनिकांनी देखील शिवरायांप्रती निष्ठा ठेऊन प्रामाणिकपणे सर्वस्व पणाला लावून स्वराज्यासाठी काम केले. त्यामुळेच महाराज स्वराज्य निर्माण करु शकले. त्यामुळे आपणही शिवरायांचा आदर्श समोर ठेऊन काम करावे असे आवाहन डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी केले. डीआरएम कार्यालय परिसरात रेल कामगार सेनेतर्फे साजर्या झालेल्या शिवजयंती उत्सवात ते बोलत होते. रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव प्रमुख पाहुणे होते.
वाटचालीची दिली माहिती
छत्रपती शिवरायांचा अर्धाकृती पुतळा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्तविकात मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा यांनी रेल कामगार सेनेच्या विभागातील वाटचालीची माहिती दिली. राजेश लखोटे यांनीही संवाद साधला.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यानंतर सरचिटणीस दिवाकर देव यांनी, कामगारांच्या प्रश्नांवर अधिक आक्रमक होण्याचा सल्ला दिला. प्रत्येक शाखेत शिवराय आणि डॉ.आंबेडकर यांची प्रतिमा, तर प्रत्येक स्थानकावर रेल कामगार सेनेचा फलक हवा, अशी सूचना केली. सूत्रसंचालन आर.एन. देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाला एडीआरएम अरूण धार्मिक, डॉ.राकेश पंचरत्न, वरिष्ठ कार्मिक अधिकारी डॉ. तुशाबा शिंदे, वरिष्ठ विभागीय अभियंता अजय टेकाडे, पी.के.भंज, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, दिनेश गजभिये, मनोजकुमार सोनी, अरविंदकुमार सिंग, एस.के.सिन्हा, आय.आय. खान, कार्मिक अधिकारी एन.एस.काझी, संजय जोशी, जनार्दन देशपांडे, नरेंद्र बुरघाटे आदी उपस्थित होते.