शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी लढा देणार

0

भुसावळ। शहरातील बाजारपेठ पोलीस स्थानकाशेजारी नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा त्वरीत बसविण्यासाठी लढा देण्याचा निर्धार बहुजन क्रांती मोर्चाची बैठकीत करण्यात आला. रिपाई गवई गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात रविवार 30 रोजी बैठक घेण्यात आली.

आंदोलनाची रुपरेषा ठरविणार
पुतळा बसविण्यासंदर्भात आंदोलनाची रुपरेषा ठरवून आंदोलन तीव्र करण्यावर एकमत झाले. तसेच नगरपालिका रुग्णालयात कायमस्वरुपी वैद्यकिय अधिकारी मिळावे, बोदवड येथील उजनी दर्ग्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा. तसेच गुरुवारी शहरातून बससेवा सुरु करण्यात यावी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष रविंद्र निकम, महेंद्र पाटील, बसपा जिल्हाध्यक्ष राकेश वाकडे, शिवसेनेचे उमाकांत शर्मा (नमा), जेष्ठ शिवसैनिक अबरार शेख, राजू डोंगरदिवे, राष्ट्रवादीचे शेख पापा शेख कालू, सुदाम सोनवणे, धनराज बाविस्कर, सुनिल राखुंडे, बाळू सोनवणे आदी उपस्थित होते.