शिवाजी विकास संस्थेच्या अध्यक्षपदी रमेश पाटील

0

एरंडोल – तालुक्यातील टोळी येथील शिवाजी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रमेश पाटील तर उपाध्यक्षपदी रमेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी संचालकांची सभा संस्थेच्या कार्यालयात पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी रमेश पाटील तर उपाध्यक्षपदासाठी रमेश पाटील यांचेच अर्ज दाखल असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री साळुंखे यांनी जाहीर केले. संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक 55 वर्षांपासून बिनविरोध होत आहे. संस्थेचे सर्व सभासद निवडणुकीसाठी होणारा संस्थेचा खर्च टाळण्यासाठी तसेच गावात कोणताही वाद होऊ नये म्हणून एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करत असतात. बिनविरोध निवडीचे सहाय्यक निबंधक के.पी.पाटील, गटसचिव संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, संस्थेचे सचिव विकास जगताप, बाळासाहेब पाटील यांनी स्वागत केले.