देहूरोड : येथील श्री शिवाजी विद्यालयातील प्राथमिक विभागाला ‘सर्वगुण संपन्न शाळा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने शाळेला द्वितीय पारितोषिक देण्यात येत असल्याचे पत्र नुकतेच शाळेला प्राप्त झाले.
रविवारी पुण्यात एका समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री जाधव यांनी दिली. सन्मानचिन्ह आणि 51 हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शाळेने पुरस्कार पटकावल्याबद्दल माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शितोळे यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. पालकवर्गातूनही शिक्षकांचे कौतुक होत आहे.