शिवाजी हायस्कूलच्या पर्यवेक्षकपदी पाडवी

0

नवापूर । येथील श्री. शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी जेष्ठ शिक्षिका सावित्री बबन पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पर्यवेक्षकपदाचा पदभार स्विकारला यावेळी त्यांचा सत्कार जेष्ठ शिक्षिका एम. एस. साळुंखे यांनी केला. संस्था व प्राचार्य विनोदकुमार पाटील यांच्या सूचना तथा परवानगीने उपमुख्याध्यापक भरत बी पाटील यांनी त्यांना पदभार सोपवला. यावेळी पर्यवेक्षक हरीश पाटील उपस्थित होते.

विविध स्तरातून अभिनंदन
पदभार सांभाळल्या नंतर नवनियुक्त पर्यवेक्षक श्रीमती पाडवी यांनी सर्व शिक्षक बंधु-भगिनी शिक्षकेत्तर कर्मचारी यांचाकडुन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच शाळेचे व संस्थेचे आभार मानले. तसेच त्यांचे नवापूर तालुका शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा प्रमिलाबाई पाटील,प्राचार्य विनोदकुमार पाटील,उपमुख्याध्यापक भरत पाटील, उपप्राचार्य एस. आर. पहुरकर, पर्यवेक्षक प्रविण पाटील,कमल कोकणी यांनी अभिनंदन करुन समाधान व्यक्त केले आहे.