शिवेंद्र जगतापची निवड

0

पिंपरी । चिंचवड येथील प्रतिभा इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी शिवेंद्र प्रमोद जगताप याची धनुर्विद्या जागतिक स्पर्धेसाठी होणार्‍या निवड चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. अर्जेंटिना येथे होणार्‍या धनुर्विद्या वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी खेळाडू निवडण्यासाठी हरियाणात निवड चाचणीसाठी घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षी मध्यप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत त्याने 70 मीटर अंतराचे सुवर्णपदक पटकविले. तसेच, आंध्रप्रदेशात झालेल्या राष्ट्रीय सबज्युनिअर स्पर्धेचे सांघिक सुवर्णपदक पटकविले. शिवेंद्र हा दहावीत शिकत असून, त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव हेमंत गडसिंग यांनी अभिनंदन केले. राष्ट्रीय धर्नुविद्या प्रशिक्षक रणजीत चांमले व सोनल बुदेले यांनी त्याला मार्गदर्शन केले.