मुंबई : साताऱ्यातील जावळी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्र राजे यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केलं आहे. ते म्हणाले, शाहू महाराज घराण्याचे वंशज छत्रपती संभाजी राजे आधीच भाजपामध्ये आहेत. आणि आज प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे वंशज असलेले शिवेंद्र राजे भाजपामध्ये दाखल झाले आहेत. मोदींनी राजगडावर जाऊन छत्रपतींचा आशीर्वाद घेतला होता, त्यानंतर ते पंतप्रधान झाले आहेत, याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी यानिमित्ताने करून दिली आहे.