जळगाव – शिव कॉलनीतील गट क्रमांक 60 व इतर भागात रात्रीच्या वेळी पाणी येत असल्याने नागरिकांना जागरण होत होते परंतु ही समस्या आता लवकरच सुटणार आहे.
प्रभाग समिती सदस्य रवींद्र नेरपगारे यांनी मनपा आयुक्तांना 18 मे रोजी निवेदन देऊन शिव कॉलनीमधील पाणी समस्या सोडवण्याची मागणी केली होती. त्यावर पाणीपुरवठा विभागाने सकारात्मक विचार केला असून, काही उपाय सुचविले आहेत. त्यामुळे रात्री पाण्यासाठी जागरण टळणार आहे, असे रवींद्र नेरपगारे यांनी सांगितले.