शिव कॉलनी परीसरात बंद घर फोडले

0
जळगाव – शिव कॉलनी परिसरातील घरात अज्ञात चोरट्यांनी 60 हजार सोने व चांदीचे दागीने चोरून नेल्याची घटनाआज सकाळी 6 वाजेच्या समारास उघडकीस आले असून रामांनद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनकर गोरख पाटील (वय-45) रा. प्लॉट 5, गट नं. 54/2, शिव कॉलनी यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी 08 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 ते 9 सप्टेंबर रोजी 2018 सकाळी 6 वाजेच्या दरम्यान बंद घर फोडून घरातील 15 हजार रूपये किंमतीचे 13 ग्रॅम कानातील सोन्याचे टोंगल, 37 हजार रूपये किंमतीचे 20 ग्रॅम कानातील सोन्याच्या साकळ्या, 2 हजार रूपये किंमतीची 1 ग्रॅम सोन्याची अंगठी व अर्धा ग्रॅम सोन्याची चिप आणि 6 हजार रूपये किंमतीचे 35 भार चांदीच्या पायातील साखळया असे एकुन 60 हजार रूपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ गोपाल चौधरी करीत आहे.