शिव जयंतीनिमित्त चोपडा शहरात विविध देखावे सादर

0

चोपडा । शहरातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवराज्याभिषेक व शिवजन्मोत्सव सोहळा अतंर्गत शहरात रैली काढण्यात आली. स्वस्तिक टॉकीज, मोठा देव्हारा, गांधी चौक, गोल मंदिर, मेन रोड, डॉ आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी चौक या मार्गावरून विद्यालयात आली. रॅलीस मान्यवरांच्या हस्ते शिवध्वज दाखवून सुरुवात करण्यात आली. रॅली शहराच्या मुख्य रस्त्या वरून जातांना नागारिकांचे लक्ष वेधून घेत होती. रॅलीत राजमाता जिजाऊ, छत्रपति शिवाजी महाराज, अफजलखान, शहिस्तेखान, जीवा महाला, सय्यद बंडा, बडी बेगम साहेबा आदि पात्र कलाकार सहभागी झाले होते.

शिवराज्याभिषेक व शिवजन्मोत्सव सोहळा: रॅलीची सांगता झाल्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. सोहळ्यात 150 विद्यार्थी-विद्यार्थिनि कलाकारांनी सहभाग घेतला होता. शिवराज्याभिषेक कार्यक्रमाच्या सुरुवातीस कस्तुरबा महिला समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील, अ‍ॅड. संदीपभैय्या पाटील, आदित्य पाटील, मुख्याध्यापक आर.डी.साठे, जी.जे. शिंदे यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. शिवराज्याभिषेक सोहळ्यात शिवरायांच्या जीवनावरील महाराष्ट्र संस्कृती दर्शन,राजमाता जिजाऊ डोहाळे, शिवजन्मोत्सव, स्वराज्याची शपथ, हर हर महादेवच्या निनादात, प्रताप गडावरील अफजलखान व शिवाजी भेटीचा प्रसंग आदी उत्कृष्ट देखावे प्रसंग सादर करण्यात आले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक एन.आर.पाटील, जी.एस. सनेर, एम.एन. पाटील, आर.पी. शाह, कोमल कोळी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.