रावेरसह सावद्यात शंभर शिव भोजन थाळीस मंजुरी
रावेर : रावेर व सावद्यात शिवभोजन केंद्र स्थापन करण्यासाठी 13 एप्रिल पर्यंत इच्छुक संस्थानी तालुका पुरवठा विभागात अर्ज करण्याचे अवाहन महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. रावेर व सावदा येथे प्रत्येकी एक शिवभोजन केंद्र स्थापन करावयाचे असून किमान शंभर शिवभोजन थाळीस शासनाने मंजुरी दिली आहे. इच्छुक संस्थांनी येणार्या 13 एप्रिलपर्यंत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी शिव थाली भोजन केंद्रासाठी केंद्र चालकांकडे स्वत:ची पर्याप्त जागा तसेच किमान 25 व्यक्तींना जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे तसेच शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार याबाबतचे परीपत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे.कोणालाही शासनाच्या अटी-शर्ती नुसारच अर्ज करायचा आहे.