जळगाव। परप्रांतिय स्त्रीने जिल्हा सामान्य रूग्णालयात एका मुलीला जन्म देवून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा सामान्य रूग्णालयात घटना होता. यानंतर महिलेविरूध्द जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पोलिस बंदोबस्तात त्या चिमुकलीस औरंबाद येथे देखभालसाठी हलविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे.
उत्तरप्रदेशातील लखाई येथील रहिवासी असलेली महिला रेहाना हेसराज शेख या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. नवजात बालकाची (मुलगी) प्रकृति चिंताजनक असल्यामुळे बालकास रूग्णालयातील एमआयसीयु विभागात उपचारार्थ हलविण्यात आले. यानंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर मातेने आपल्या पोटच्या मुलीला घेवून न जाता चक्क तेथे सोडून पलायन केले होते. याप्रकरणाचा तपास पीएसआय के.बी.भुजबळ हे करीत असतांना आज मंगळवारी त्या नवजात बालकास पोलिस बंदोबस्तात औरंगाबाद येथे संगोपणासाठी हलविण्यात आले आहे. तसेच पोलिसांचे पथक मातेचा शोध देखील घेत आहेत.