रावेर । शहरातील सरदार जी.जी. हायस्कूल व कमलाबाई गर्ल्स हायस्कूल या शाळेच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खाते उघडण्यासाठी गेल्या महिनाभरापासून फेर्या मारत आहे. परंतु सदरील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती खाते उघडण्यास बँक कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. तसेच विद्यार्थी, विद्यार्थीनींना व त्याच्या पालकांना बँकेतून हाकलून दिले जात आहे व अतिशय हिन दर्जाची वागणूक दिली जात आहे.
यांची होती उपस्थिती
या बँकेची ही समस्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत दरवर्षाचीच आहे. लवकरात लवकर आपल्या माध्यमातून प्रशस्त मार्ग काढीत आम्हा विद्यार्थ्यांना व पालकांना सहकार्य करावे. निवेदन देतांना प्रणित महाजन, महेंद्र दाणी, धनालाल शिंदे, गौरव बारी, सागर महाजन, वैभव चौधरी अक्षय पाटील आदी उपस्थित होते.