पुणे । पुणे महापालिकेतर्फे इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना उत्तम गुण प्राप्त केल्याबद्दल शिष्यवत्ती देण्यात येते. यासाठी अर्ज करण्याची मुदत सोमवारी संपली. ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी नगरसेवक प्रवीण चोरबेल यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.
पुणे महापालिकेतर्फे इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना उत्तम गुण प्राप्त केल्याबद्दल शिष्यवत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. मात्र ऑनलाईन अर्ज करताना विद्यार्थ्यांना काही समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दयावी, अशी मागणी चोरबेले यांनी निवेदनातून केली आहे.