शिवसेना भुसावळ तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्या मागणीला आले यश
भुसावळ- सामाजिक न्याय विभागातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या विविध शिष्यवृत्तीसाठी ‘महाडीबीटी’ च्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले असलेतरी या पोर्टलवर काम अत्यंत धीम्या गतीने होत असल्याने शिवाय वेबसाईट वारंवार डाऊन होत असल्याने विद्यार्थ्यांना कागदपत्र अपलोड करताना विविध अडचणींचा सामोरे जावे लागत होते. याबाबत शिवसेनेचे भुसावळ तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे 29 रोजी केली होती. या तक्रारीची दखल घेत ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुदतवाढीमुळे मिळाला दिलासा
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी सादर करावयाच्या ऑनलाईन अर्जासाठी मुदत आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याने इंजिनिअरींग, फार्मसी, मेडिकल, आयटीआय, बी.एड., डी.एड.च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जाचक अटी व नियमामूळे विद्यार्थी संभ्रमात
शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची पद्धत केवळ ऑनलाईनच असल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. आयटीआयचा अर्ज दाखल करतांना फक्त मागासवर्गीय अर्ज भरले जात असून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे परंतु काही अभ्यासक्रमांना तीनही वर्षाच्या निकालाच्या प्रति अपलोड करायच्या असून 256 केबी साईझपेक्षा जास्त फोटो अपलोड होत नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.