शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0

शिरपूर । शिरपूर येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पाचवी व आठवी च्या वर्गासाठी घेण्यात आलेल्या स्कॉलरशीप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव नगराध्यक्षा जयश्रीबेन पट ेल यांच्या हस्ते संस्थेच्या कार्यालयात करण्यात आला.संस्थेच्या विविध शाळांमधील पाचवीच्या 56 विद्यार्थ्यांनी व आठवीच्या 38 विद्यार्थ्यांनी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी व ग्रामीण भागात गुणवत्ता यादीत घवघवीत यश संपादन केले आहे. या सर्व 94 गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे गौरव करण्यात आला.

94 गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे कौतुक
याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, गटशिक्षणाधिकारी पी.झेड.रणदिवे, शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ गायकवाड, बांधकाम सभापती संगिता देवरे, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य पी.व्ही.पाटील, मुख्याध्यापक आर.एन.पवार, आर.बी.पाटील, रवि बेलाडकर, एच.के.कोळी, बी.बी.सोनवणे, गणेश साळुंखे, महेंद्रसिंग परदेशी, सी.डी.पाटील, मुबीन शेख, इफ्तेखार सैयद, पर्यवेक्षक के.आर.जोशी, ए.एच.जाधव, एस.ए.कुरेशी, सुनिल पाटील, बी.जी.पिंजारी, राकेश मोरे, सतिष निकुंभे, एन.बी.पाटील, पी.डी.बच्छाव. पी.डी.सोनवणे, आर.बी.जाधव, भावना पाटील, आर.एस.पाटील, आर.एस.कुलकर्णी, सचिन बोरसे आदींसह विविध शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.