शिष्यवृत्ती परीक्षेत नंदिनीबाई विद्यालयाचे यश

0

जळगाव- सन २०१७-१८ मध्ये झालेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती व एन. एम. एम. एस परीक्षेत नंदिनीबाई विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थीनींनी विशेष यश संपादन केले आहे.

दरम्यान, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीची जान्हवी बागुल, मनस्वी दाळवाले, रूचिका महाजन, तर शहरी सर्वसाधारण विभागात हर्षा कुरकुरे, श्रृती शिंपी, माहेश्वरी नारखेडे, कृतिका पाटील या विद्यार्थींनी उत्तीर्ण झालेल्या आहेत़ तोच एन. एम. एम. एस परीक्षेत सोनल चौधरी, पुर्वा पाटील, हर्षदा सुर्वे, रिया पाटील, स्नेहा वाणी, साक्षी शिंदे, नंदिनी तायडे या विद्यार्थीनी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या आहेत़ संस्थेचे अध्यक्ष डॉ़ सुभाष चौधरी, सचिव एऩएस़पाटील, सहसचिव डॉ़ डी. के. टोके, संचालक प्रा. आ. र. डी वायकोळे यांच्या हस्ते या विद्यार्थीनींचा गौरव करण्यात आला़ यावेळी प्राचार्या सी़एस़पाटील, उपमुख्याध्यापक आऱआऱपाटील, एऩव्ही़ महाजन, व्ही. एस. सैदाणे, पी़व्ही़ वाणी, व्ही़जी़ढोले, एस़पी़तायडे उपस्थित होते.