मुंबई । बहुचर्चित शीन बोरा हत्या प्रकरणाचा तपास करणार्या तपास अधिकार्याच्या पत्नीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर त्यांचा मुलगा गायब आहे. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. मुंबईतल्या सांताक्रुज पश्चिम भागातील जी के पार्क या इमारतीतील ए विंगच्या फ्लॅट नंबर 303 पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गानोरे राहतात.
मंगळवारी रात्री ुशीरा कामावरुन घरी आल्यावर त्यांनी घराची बेल वाजवली. बराच वेळ बेल वाजूवूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. हाताने दरवाजा ठोकूनही काहीच उपयोग होत नसल्याने गणोरेंनी दरवाजा तोडला. घरात त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे समोर आले. गणोरेंनी लगेचच 100 क्रमांकावरून पोलिसांना हत्येची माहिती दिली. यानंतर दीपाली गणोरे यांना तातडीने व्ही. एस. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असुन गानोरे यांचा मुलगा आणि घरातील एक सदस्य बेपत्ता असल्याचे लक्षात आले.
ज्ञानेश्वर गणोरे हे शीना बोरा हत्येचा तपास करत असल्याचे सांगण्यात येते. ते मुंबईतील खार पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्या तपासाच्या आधारवरच मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला अटक करण्यात आली होती. आपल्या पत्नीच्या हत्येचा गणोरे यांना धक्का बसल्याचे सांगण्यात येते. पोलीस पुढील तपास करत आहेत.
पैशाच्या वादानंतर मुलानेच जीव घेतल्याचा संशय
हत्येप्रकरणी मुलावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. पैशावरुन झालेल्या वादानंतर मुलगा सिद्धांतनेच जन्मदात्रीचा जीव घेतल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. हत्येची घटना उघडकीस आल्यापासून सिद्धांत बेपत्ता आहे आणि घरातील दोन लाखांची रक्कमही गायब आहे. दीपाली गणोरे यांच्या मृतदेहाशेजारी रक्ताने टायर्ड ऑफ हर, कॅच मी अँड हँग मी (तिला कंटाळलो आहे. मला पकडा आणि फासावर लटकवा) असे लिहून पुढे स्माईली काढण्यात आला आहे.