जळगाव। मथील महानगर पालिकेच्या चारही प्रभाग समिती सभापतींचा कार्यकाळा संपत असल्याने निवणुक प्रकीयेस सुरुवात करण्यात आली आहे. चार समित्यांच्या सभापतीपदासाठी आज बुधवार 29 मार्चपर्यंत मुदतीत खान्देश विकस आघाडी, महाराष्ट्र न2वनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी 12 अर्ज नेले आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे समित्यांवर बहुमत नसल्याने त्यांच्याकडून अर्ज नेण्यात आला नाही. महानगर पालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडीसाठी शुक्रवार 31 रोजी सभा होणार आहे. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजेपासून चार प्रभाग समिती सभापती
अशी होईल निवडणूक प्रक्रीया
सोमवार 27 मार्चपासून प्रभाग समिती सभापतींसाठी अर्ज मिळण्यास सुरूवात झाली आहे. बुधवारी अर्ज नेण्याचा शेवटचा दिवस होता. गुरुवार 30 रोजी 11 ते 2 या वेळेत नगरसचिव यांच्या कार्यालयात अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. शुक्रवारी प्रत्येक प्रभागसासाठी स्वंतत्र सभा घेण्यात येणार असून सभा झाल्यानतंर 15 मिनिटे माघारासाठी मुदत देण्यात येईल त्यांनतर निवडणुक होणार आहे. प्रभाग समिती सभापती यांची निवड वर्षभरासाठी असते.
निवडणूक बिनविरोधची हालचाल
सभापती निवडणुक देखील बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. खान्देश विकास आघाडीने भाजपाला मागील निवडणुकींप्रमाणे सभापतीपदापासून दूर ठेवण्यासाठी रणनिती आखली आहे. खान्देश विकास आघाडी, राष्ट्रवादी व मनसेची युती असल्याने दोन सभापती खान्देश विकास आघाडी व राष्ट्रवादी व मनसेला प्रत्येकी 1 सभापती पद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
यांनी नेले अर्ज
मागील वर्षी निवड झालेल्या सभापती यांनी वर्षभरात एकही सभा घेतलेली नाही. नगरसेवक जितेंद्र मुंदडा यांनी खान्देश विकास आघाडीसाठी 4 अर्ज, संतोष पाटील व पार्वताबाई भिल यांनी मनसेसाठी प्रत्येकी 2 अर्ज, रविंद्र पाटील व गायत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रत्येकी 2 अर्ज नेले आहेत. सभापतीपदाच्या 4 जागांसाठी या तिनही पक्षांच्या नगरसेवकांनी 12 अर्ज नेले आहेत. खाविआ, राष्ट्रवादी व मनसे एकत्र असल्याने भाजपाचे कुठल्याही समितीमध्ये बहुमत नसल्याने त्यांच्याकडून शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज नेण्यात आला नाही.