शुक्रवारी नॅक समिती नाईक महाविद्यालयात

0

शहादा । येथील वसंतराव नाईक महाविद्यालयास शुक्रवारी नॅक समिती भेट देणार असुन नॅक मुल्यांकनासाठी महाविद्यालय सज्ज झाले आहे. राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयांची गुणवत्ता ठरविणेसाठी युजीसी नॅक स्वायंत्त संस्थेतर्फे विविध विद्यापीठ मान्यताप्राप्त महाविद्यालयांचे मूल्यांकन करुन मनांकन दिले जाते. महाराष्ट्र राज्य शासनाने सर्वच विद्यापीठातील महाविद्यालयांना नॅक अनिवार्य केले आहे. सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धुळे संचलित शहादा येथील वसंतराव नाईक महाविद्यालयास यावेळी नॅक समिती भेट देणार असून समितीकडुन मूल्यांकन करुन घेण्यासाठी महाविद्यालय सज्ज झाले आहे.

अहवाल सादर करणार
दि. 22 व 23 सप्टेंबर रोजी त्रिसदस्य नॅक समिती भेट देऊन पहाणी करणार आहे. या समितीत बंगलोर येथील जैन विद्यापिठाचे कुलगुरू प्रा.डॉ. एन. सुंदरराजन , बनारस हिंदू विद्यापीठाचे प्रा. कृष्णमोहन पांडे, प्रा. डॉ. राधीका नायक यांचा समावेश आहे. ही समिती दोन दिवस महाविद्यालयातील विविध घटकांशी चर्चा करुन व वेगवेगळ्या पातळीवर परिक्षण करुन अहवाल सादर करेल अशी माहिती महाविद्यालयाचे नॅक समितीचे समन्वयक प्रा. डॉ. आर. बी. सोलंकी व प्राचार्य डॉ. ए. एन.पाटील, उपप्राचार्य आर. बी मराठे, प्रा. डॉ. एच. एस. पाटील यांनी दिली आहे.