शुद्धनाद संस्थेच्या वादन मैफलीत त्रिवेणी संगम

0

पुणे । सतारीच्या तारांमधून निर्माण झालेला कर्णमधुर नाद सतारीच्या मधुर नादामध्ये एकरूप झालेले वातावरण सतार, तबला आणि हार्मोनिअम या वाद्यांचे लयबद्ध सादरीकरण या तीन वाद्यांच्या अप्रतिम वादनाविष्काराची अनुभूती रसिकांनी घेतली. अनिरुद्ध जोशी (सतार), प्रसाद कुलकर्णी, सागर पटोकार (तबला), सुमेध थत्ते (हार्मोनिअम) या वादकांनी आपल्या तरल वादनातून वादन मैफलीत अनोखे रंग भरले.

शुद्धनाद संस्थेतर्फे सदाशिव पेठेत राजाराम मंडळाजवळील अ‍ॅसेट गोल्ड येथे 23व्या छोटेखानी मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. नवोदित कलाकारांना आपली कला रसिकांसमोर सादर करता यावी, यासाठी प्रत्येक महिन्यात मैफलीचे आयोजन करण्यात येते. यावेळी कलाकारांनी आपली कला रसिकांसमोर सादर केली. शुद्धनाद संस्थेचे संस्थापक अश्विन गोडबोले, अनुप कुलथे, कपिल जगताप उपस्थित होते.

मैफलीची सुरुवात पुरीया धनाश्री रागाने झाली. त्यानंतर हार्मोनिअमवर सुमेध थत्ते यांनी सादर केलेल्या जनसंमोहिनी रागाने रसिकांची विशेष पसंती मिळविली. काफी रागाच्या वादनाने पहिल्या सत्राचा समारोप झाला. प्रसाद कुलकर्णी याने (तबला) यांनी अप्रतिम साथ दिली.अनिरुद्ध जोशी यांनी खमाज रागाने सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी काटा रुते कुणाला हे नाटयगीत सादर करुन रसिकांची विशेष दाद मिळविली.