धुळे । शहरातील जनतेला गेल्या अनेक वर्षापासून दूषित पाणीपुरवठा होत असून रोजंदारीवर या विभागाचा कारभार सुरु आहे. जलशुध्दीकरण केेंद्र रामभरोसे झाले असून केमिस्ट, पंपचालक, फिटर, ऑपरेटर नसल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. शहराचे पाणी संपविण्यामागे राजकारण केले जात असून भविष्यात अनर्थ घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विचारला आहे. यासंदर्भात आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.
पाण्याची नासाडी रोखावी
शुध्द पाणी पुरवठेबाबत महापौरांकडे वारंवार लेखी तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्यानेसाथीचे रोग पसरले आहे. शहराला दररोज एक ते सव्वा एमसीफटी पीण्याचे पाणी पुरेसे असतांना अडीच ते तीन एमसीएफटी पाणी सोडून शहराचा पाणीसाठा संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याची चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतांना शिवसेनेचे संजय गुजराथी, गंगाधर माळी, हिलालमाळी, सुबोध पाटील, प्रशांत श्रीखंडे, देविदास लोणारी, पुरुषोत्तम जाधव, मनोज शिंदे, रामदास कानकाटे आदी उपस्थित होते.