शुध्द पाण्यासाठी शिवसेना करणार अधिकार्‍यांना जलाभिषेक

0

मुक्ताईनगर। शहरात पिण्याचा पाणी पुरवठा गढूळ व दुषीत होत असुन यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. नागरीकांना उलट्या व जुलाबचा त्रास वाढत आहे. तसेच गटारींचीही दयनिय परीस्थिती झाली असुन गावातील घन कचर्‍याचीही विल्हेवाट लावण्यास ग्रामपंचायत प्रशासन सपशेल अपयशी ठरत असुन नागरीकांच्या जिवाशी सुरु असलेला हा खेळ दोन दिवसात थांबवावा अन्यथा संबंधितांना जलाभिषेक करण्याचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या सुचनेनुसार पदाधिकार्‍यांनी गटविकास अधिकारी एस जी बैरागी यांना दिले.

हेतुपुरस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप
शहरात ग्रामपंचायत मार्फत दुषीत पाणीपुरवठा सुरु असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथीचे आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. परंतु मुक्ताईनगर येथील सरपंच व ग्रामविकास अधिकारी हेतुपुरस्कर त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

बिसलरीचे पाणी देण्याचे आश्‍वासन विरले
बिसलरीचे पाणी शहरवासियांना देण्याचे आश्‍वासन हवेत विरले असून 10 वर्षापासून भारत निर्माण योजनेचे जलशुध्दीकरण केंद्राचे काम अद्याप पुर्णत्वास आले नसून वारंवार निवेदन व आंदोलन करुन सुध्दा काम पुर्ण झालेले नाही. या योजनेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार समितीमार्फत झालेला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी गटविकास अधिकारी बैरागी यांना निवेदन देतांना तालुका प्रमुख छोटू भोई, निलेश बोराखेडे, प्रफुल्ल पाटील, वसंत भलभले, गणेश टोंगे, प्रविण चौधरी, अमरदीप पाटील, आकाश सापधरे, शुभम तळेले, साबीर पटेल, प्रकाश गोसावी, चेतन पाटील, संतोष कोळी, हरी माळी, पिंटु पाटील आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी तिव्र संताप व्यक्त केला.