मुंबई । सुरेश आचरेकर स्मृती चषक शालेय कॅरम स्पर्धेतील मुलांच्या 16 वर्षाखालील गटात शुभम घागरेने कृष्णा पांडेचा 25-9, 25-0 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावले.
प्रआयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आणि स्पोर्ट्स असोशिएशन फॉर इंडियन स्कूल चिल्ड्रेनतर्फे डॉ. अँटोनियो डा सिल्वा हायस्कूलच्या सहकार्याने खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात ओम रावलने तर 12 वर्षांखालील गटात मिहीर शेखने विजेतेपद पटकाविले. 14 वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत ओम रावलने साहिल पुंगीवर 25-13, 25-10 असा तर 12 वर्षांखालील अंतिम फेरीत मिहीर शेखने ओम नाईकवर 25-16, 25-14 असा विजय मिळवला. 116 खेळाडूना भारतीय संघाचे प्रशिक्षक सुहास कांबळी यांनी मार्गदर्शन केले.