पिंपरी । पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील शुभम तोडकर याची चीनमधील तायपेई येथील जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तो नुकताच चीनला रवाना झाला आहे. नवी दिल्ली येथील ऑल इंडिया युनिव्हर्सिटीच्या वतीने आचार्य नागार्जुन विद्यापीठ, गुंटूर येथे आयोजित केलेल्या जागतिक वेटलिफ्टिंग निवड चाचणीत शुभम तोडकर सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणेचा प्रतिनिधी म्हणून सहभागी झाला होता. त्यात अव्वल ठरल्याने शुभम आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होत आहे.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे यांनी शुभम तोडकर आणि क्रीडाशिक्षक प्रा. राजेंद्र लांडगे यांचे अभिनंदन केले आहे.