शुल्क वाढीविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची गाळेधारकांची तयारी

0

जळगाव : महानगर पालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत ज्या मार्केटमधील गाळ्यांची मुदत संपलेली नाही त्या गाळ्यांच्या हस्तातरण शुल्काची निश्चिती करण्यात आली आहे. बहुमताने तो प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून या प्रस्तावानुसार गोलाणी मार्केटच्या हस्तांतर शुल्काची रक्कम अन्यायकारक असल्याचा आरोपकरीत गाळेधारकांनी हायकोर्टात जाण्याची तयारी केली आहे. महापालिकेच्या 29 मार्केटमपैकी 18 मार्केटमधील 2175 गाळेधारकांच्या करारनाम्यांची मुदत संपली आहे. 19 मार्केटमधील गाळेधारकांच्या करारनाम्यांची मुदत अद्याप बाकी आहे. मुदत संपलेल्या मार्केटमचा निर्णय शासनाकडे प्रलंबित असल्याने महापालिका प्रशासनाने ज्या मार्केटची मुदत शिल्लक आहे. त्यांचे रेडीरेकनर दरानुसार शुल्क निश्चित केले आहे. या शुल्कास महासभेत बहुमताने मंजूरी देण्यात आली. हस्तातंरण शुल्काच्या निर्णयाचा फेर विचार करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच रेडीरेकनरनुसार शुल्क असल्याने ते प्रत्येक मजल्यानुसार वेगळे पाहीजे होते. मात्र, तसे करण्यात आले नसल्याचे गाळेधारकांचे म्हणणे आहे. तसेच करारनाम करतांना पहील्या 5 वर्षात हस्तांतर शुल्क 10 हजार रुपये तर त्यानतंर 25 हजार रुपये असे नमूद केलेले असतांना अचानक करण्यात आलेली शुल्कवाढ अन्यारकारक असल्याचे देखील गाळेधारकांचे म्हणणे आहे. ही भुमिका घेवून गाळेधारकांनी कोर्टात जाण्याची तयारी केली आहे.

अस्वच्छतेच्या तक्रारींसाठी मनपाचा स्वतंत्र फोन नंबर
जळगाव । शहरात घंटागाडीमार्फेत कचरा उचलला जात आहे. मात्र, काही वार्डांमध्ये घंटागाडी येत नसल्याच्या नगरसेवक व नागरिकांनी तक्रारी केल्यावर महानगर पालिकेच्यावतीने अशा तक्रारींसाठी फोन नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक वार्डांत घराघरातून कचरा गोळा करण्यासाठी स्वंतत्र घंटागाडी देण्यात आलेली आहे. तसेच कुंड्या उचलणे व नेहमी जिथे कचरा पडतो तेथील कचरा उचलण्यासाठी दुसरे स्वंतत्र वाहन महानगर पलिकेकडून देण्यात आले आहे. तरी वार्डांतील कचरा दररोज उचलला जात नसेल तर 2235210 या क्रमांकावर कार्यलयीन वेळेत नागरिकांना करता येणार आहे. हा क्रमांक खास स्वच्छतेच्या तक्रांरीसाठी ठेवण्यात आला आहे. यावर फोनवर तक्रार केल्या 24 तासात निराकरण महानगर पालिकेकडून करण्यात येईल. नागरिकांमध्ये याची जनजागृती होण्यासाठी हा क्रमांच 20 चौंकात कायस्वरूपी लावण्यात येणार आहे. तरी नगरिकांनी स्वच्छतेबाबत काही तक्रार असल्यास ती या क्रमांकावर करण्याचे आवाहन आयुक्त जीवन सोनवणे यांनी केले आहे. दरम्यान, महानगर पालिकेने एकूण 37 वार्डांपैंकी 22 वार्डांमध्ये सफाईचे मक्ते देण्यात आलेले असून उर्वरीत 17 वार्डांची सफाई मनपा कर्मचार्‍यांकडून करण्यात येत आहे. आता या 17 वार्डांपैकी 4 वार्डांचा सफाई मक्ता देण्याबाबत स्थायी सभेत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. यामध्ये वार्ड क्र. 11, 12, 17 व 18 या चार वार्डांचा समावेश करण्यात आलेला आहे.