शेंटीमेंटलचा’ तडकेदार ‘टीजर’ प्रदर्शित!

0

मुंबई : पोस्टर बोइज आणि पोस्टर गर्ल मुळे हसता हसता ‘सेंटीमेंटल’ करणारा लेखक आणि दिग्दर्शक अशी समीर पाटील यांची ओळख झाली आहे. अशोक सराफ यांना पोस्टररुपी दिलेल्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छांमुळे त्यांच्या नवीन ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती परंतु आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘टीजरमुळे’ समीर पाटील यांनी यंदाच्या मान्सूनमध्ये पुन्हा एकदा तुफान मनोरंजक तडका प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे याची खात्री पटते.

अभय जहागीरदार, समीर पाटील, संतोष बोडके, मंजुषा बोडके निर्मित आणि आर. आर. पी. कॉर्पोरेशन, डॉ. अंबरीश दारक, बनी डालमिया प्रस्तुत‘शेंटीमेंटल’ या चित्रपटातून मराठी सिनेमा ‘फर्स्ट टाईम’ बिहारला पोहोचणार असून महाराष्ट्र पोलिसांच्या एका ‘इंटर स्टेट ऑपरेशनची’ ‘इंटरेस्टिंग’ कथा या चित्रपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे.
अशोक सराफ यांच्या सोबतच उपेंद्र लिमये,विकास पाटील, पल्लवी पाटील, देवयानी यादव, रमेश वाणी, माधव अभ्यंकर, उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोत्री, राजन भिसे आणि विद्याधर जोशी यांची ‘फुल टू कॉमिक अ‍ॅक्शन’ असणारा हा चित्रपट येत्या 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.