शेंदुर्णी । शेंदुर्णी येथे पहूर दरवाजा ते कुंभार गल्ली परिसरात गेल्या 5-6 महिन्यांपासून नळाला चक्क गटारीचे पाणी येत असल्यामुळे येथील नागरिकांचा संतापाचा उद्रेक होऊन शुक्रवार 28 जुलै रोजी ग्रामपंचायत वर महिलांचा मोर्चा काढून नळातून आलेल्या गटाराचे पाण्याच्या बाटल्या व निवेदन दिले. याबाबत वार्डमधील ग्रा.पं. सदस्य मुक्ताबाई चौधरी याचे पती कृष्णचौधरी यांना वेळोवेळी सदर प्रकार निदर्शनास आणून दिल्यावर देखील त्यांचे व ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत पत्रकारांनी जाब पाणी पुरवठा विभाागाचे प्रमुख संजय पायघन यास विचारला असता अरेरावीची भाषा केली. यावेळी नळाला गटारीचे पाणी येणे, 4 ते 5 दिवस घंटा गाडी न येणे, आल्यास गाडीचा सायरन न वाजवता तसेच निघून जाणे, आदी ग्राम पंचायत समस्यांचा महिलांनी पाढाच वाचला.
आंदोलनाचा इशारा
सदर निवेदनात दोन दिवसात पाईप लाईन दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या आधीही अशाच प्रकारे श्रीकृष्ण कॉलनी, अतुल नगर, शिवाजी नगर भागातील नागरी कानी गटारचे पााणी नळतून येेेत असल्याचे तक्रारी केलेल्या आहेत. आजच्या निवेदनावर आनंदीबाई चौधरी, लताबाई चौधरी, विजया बैरागी, विमल परदेशी, नलिनी चौधरी, नयना चौधरी, सुलोचना चौधरी, सवीता चौधरी, शांताबाई चौधरी, सुरेंद्र चौधरी, निलेश चौधरी, रामदास चौधरी, सुनिल शिंपी आदि सह्या आहेत.
आलेल्या तक्रारीनुसार पाईपलाईन गळती शोधण्यासाठी सिमेंट रस्तेही खोदले पण लिकेज सापडले नाही. सदर नागरिकांचे नळकनेक्शन गटारी शेजारीच आहेत, तसेच नळाला तोट्या लावलेल्या नाहीत व पाणी भरून झालेवर सुध्दा नळ गटारीत वाहतात त्यामुळे गटाराचे पाणी नकळत नळातून पाईप लाईनमध्ये जाते व पुन्हा पाणीपुरवठा केला असता पाहिले. पाईपलाईनमध्ये साचलेले तेच पाणी नळातून येते तरीही पाईपलाईन जुनी असल्याने समस्या कायमची मार्गी लावण्यासाठी त्याभागात व इतरही भागात येत्या काही दिवसात नवीन पाईपलाईन टाकून ही समस्या कायमची सोडविली जाईल.
कृष्ण चौधरी, माजी ग्रा.पं.सदस्य