शेंदुर्णी । येथील 273 वर्षांची परंपरा असलेल्या संत कडोजी महाराज यांनी सुरू केलेल्या रथाचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन हस्ते व सरपंचपती अमृत खलसे आणि कडोजी संस्थानचे 8 वे गादी वारस हभप शांताराम भगत यांनी सपत्नीक पूजन केले या वेळी जळगांव प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील, जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्षा सौ. रोहिणी खडसे खेवलकर पहुर येथील जि. प. सदस्य अमित देशमुख यांची विशेष उपस्थिती होती आज शेंदुर्णीत मोठया भक्ती भावाने रथ उत्सव साजरा झाला. हजारो भाविकानि विठ्ठल रुख्मिनी नामाच्या गजरात चिंब होऊन भक्ती भावाने डोळ्याचे पारणे फेडणारा अनोखा पारंपरिक सोहळा अनुभवला.सकाळ पासूनचभक्तांनी गर्दी केली होती.
नदी काठी यात्रोस्तव.. येथीलच सोन नदी
यावेळी शेंदुर्णी ग्रामपंचायतचे उपसरपंच नारायण गुजर, जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य व यात्रा कमिटी अध्यक्ष गोविंद अग्रवाल, स्थानिक पं.स. सदस्य डॉ किरण सूर्यवंशी, माजी सरपंच सागरमल जैन,शांताराम गुजर, यशवंत पाटील यांनी रथाची पूजा अर्चा व आरती करण्यात आली. यात्रोत्सव 15 दिवस साजरा केला जात असला तरी सध्या शेती मालाला भाव नसल्याने बाजारात पैश्याची उपलब्दता नसल्याचा परिणाम यात्रेत जाणवत असल्याचे व्यापारी वर्ग नाराज असल्याचे दिसून आले. काठावर मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली आहे. पाळणे,खेळणे फराळ,संसार उपयुक्त साहित्य, फुलहार च्या दुकानात नागरिकांनी गर्दी केली होती, यात्रोत्सवात मोठया प्रमाणावर गर्दी होते म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय केर्हाळे यांनी यात्राकाळात 10 पोलिसांची विशेष नेमणूक केली आहे पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी केशवराव पातोंड, पहुर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, हनुमंताराव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे व शेंदुर्णी येथील पोलीसांनी चांगला बंदोबस्त ठेवला होता तरीही काही महिलांच्या सोन्याच्या पोत चोरीस गेल्याचे कळल्यावर पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या नागरिकांच्या सहकार्यांनी आवळलायला सुरवात केली होती.