शेंदुर्णी । पक्षाशी एकनिष्ठ प्रामाणीक कार्यकर्त्यांचा जोरावर तालुक्यामध्ये पक्षाचे संघटन आजही टिकून आहे. मतदारांची श्रद्धा आजही कायम आहे. त्यामुळे झालेल्या आणि होऊ घातलेल्या विविध विभागांच्या, सोसायटीच्या निवडुकांमधून यशाच्या रूपाने दिसून येत आहे. धनशक्ती समोर जनशक्तीचा विजय होत असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांनी व्यक्त केले. ज्यांना पक्षाने दहा वर्ष पद देऊन मोठे केले, ज्यांनी पक्ष वाढविण्यापेक्षा पक्षाचा विश्वासघात करून, सर्व प्रकारची संधी देऊन सुध्दा स्वतःची धमक नसल्याने अन्याय होत असल्याच्या बोंबा मारत पक्ष सोडून गेलेल्यांसाठीच्या संतप्त भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. व दिल्या घरी सुखी रहा ! अश्या उपरोधिक शुभेच्छाही दिल्या. यावेळी तालुकाध्यक्ष, युवा तालुकाध्यक्ष व विधानसभा क्षेत्र प्रमुख हे पद रिक्त असल्यामुळे इच्छुकांनी परीचय पत्र दिले. आता वर्णी कोणाचे लागते याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.
पक्षश्रेष्ठी भरणार रिक्तपद
रिक्त झालेल्या तालुकाध्यक्ष व इतर पदाचा चेंडू पक्ष श्रेष्ठींच्याकडे टोलवण्यात आला, परंतु याप्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष, युवकाध्यक्ष, महिलाध्यक्ष तसेच तालुक्यामध्ये रीक्त झालेल्या इतर पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी स्वतःचा परीचय आणि संघटनसाठी आखलेली धोरणात्मक वाटचाल सांगुन मुलाखती दिल्या, इच्छुक उमेदवारांचे परीचय पत्र हे पक्षश्रेंष्टींकडे पाठविण्यात येणार असल्याने पक्षश्रेष्ठी तालुक्यातील रिक्तपदी कोणाची निवड करण्यात यावी, हे ठरविणार असल्याचे तालुक्यातील वरिष्ट नेत्यांनी सांगितले. त्यामुळे मेळाव्यात तालुकाध्यक्ष पदाच्या चर्चांना पुर्ण विराम देण्यात आला.
रिक्तपदांसाठी यांची चढाओढ
तालुकाध्यक्षपदासाठी राजेंद्र पाटील (कसबा पिंप्री), प्रल्हाद बोरसे (जामनेर) , किशोर पाटील (सोनारी) , ज्ञानेश्वर बोरसे (लोणी), अरूण उघडे (टाकरखेडा) , जिवन पाटील (किन्ही) , दिलीप पाटील (मुंदखेडा), ज्ञानेश्वर पाटील (तोंडापुर), भगवान पाटील (टाकरखेडा), आबा चौधरी (फत्तेपुर), प्रल्हाद गायकवाड, नाना पाटील, राजेंद्र चौधरी (पाळधी) हे इच्छुक असून तर युवक अध्यक्षपदासाठी किशोर खोडपे (नेरी ,सागर कुमावत, अर्जुन पाटील, आशिश दामोदर, उज्वल पाटील, किरण पाटील, दत्ता इधाटे हे इच्छुक आहेत. आणि विधानसभा क्षेत्र प्रमुख पदासाठी सुनिल पाटील, दिनेश पाटील, डॉ दिवाकर पाटील यांची नावे चर्चेमध्ये आहेत.
नामदारांच्या व्यक्तव्याचा निषेध
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ.सतिष पाटीलांबद्दल ना.महाजनांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. येथे आचार्य गजाननराव गरुड सभागृहात झालेल्या राष्ट्रवादी मेळाव्यास तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड, डि.के.पाटील, प्रमोद पाटील, प्रदीप लोढा, कैलास पाटील (पाळधी), अॅड. ज्ञानेश्वर बोरसे, ज्ञानेश्वर राजपुत (देव पिंप्री), जावेद मुल्लाजी, अशोक नेटकर, मुकुंदा जोहरे, दिलिप पाटील (मुदखेडा) रामलाल नाईक, राजु पाटील, प्रल्हाद बोरसे, सुनिल पाटील, किशोर खोडपे, डॉ. किरण सुर्यवंशी, शांताराम गुजर कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.