शेंदूर्णी: यंदाचे ९९ वे वर्ष असलेल्या श्रीराम जन्मोत्सव सोहळा यंदा करोनाच्या पार्श्वभुमीवर अतिशय साध्य पद्धतीने परंपरा जोपासत पोलिस प्रशासन व सरकारने घालुन दिलेल्या अटीनुसार केवळ चारच व्यक्तिंच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता श्रीराम मंदिरात प्रभु रामरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहाचे वातावरण होते पुढच्या वर्षी उत्सवाचे १०० वे वर्ष आहे
प्रथा व परंपरेनुसार श्रीराम मंदिर आतुन झेंडुच्या फुलांनी सुंदर सजविण्यात आले आहे.सकाळी परंपरेने सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित व्यापारी किशोर काबरा यांनी सपत्नीक श्रीरामास अभिषेक व पुजा केली.दुपारी १२ वाजता केवळ ४ जणांच्या उपस्थितीत श्रीराम प्रभुंचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. प्रभुंचा पाळणा सुंदर, आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता.त्यात प्रभुंची मुर्ती ठेवण्यात आली बरोबर १२ वाजता प्रभु रामचंद्र कि जय या जयघोषात रामरायांचा जन्मोत्सव पार पडला.रामाचा पाळणा म्हण्यात आला तद्नंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. दरवर्षी हजारोंच्या उपस्थितीत होणारा सोहळा यंदा मात्र केवळ ४ व्यक्तिंच्या उपस्थितीत पार पाडावा लागला.यामुळे अनेक भाविकांना आपले यंदा दर्शन झाले नाही त्या बद्दल भाविकांना हळहळ लागुन राहिली.
Prev Post