शेंदुर्णी। ज्या शाळेत आपले शिक्षण पुर्ण झाले, शिक्षण घेऊन यशाची उच्च शिखरे गाठुन आज स्वःकर्तुत्व मिळविले त्या शाळेची नेहमीच आठवण येत असते. मात्र धकाधकीच्या व स्पर्धेच्या जीवनात ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची विसर पडते. मात्र शेंदुर्णी येथील गरुड शाळेत 37 वर्षापूर्वी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेप्रती असलेल्या ओढीने पुन्हा चागरुड शाळेत वर्ग भरविला. 1980 च्या दरम्यान गरुड हायस्कूल मधे शिकणार्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पूर्वीच्या प्रमाणेच जमीनीवर बसुन शिक्षण घेतले. गुरुबद्दल असलेल्या आत्मियता दाखवत विद्यार्थ्यांनी गुरुजणांचा सत्कार केला. निवृत्त झालेले शिक्षक सत्काराने भाऊक झाले.
सेवानिवृत्ती नंतर वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या शिक्षकांशी संपर्क साधुन त्यांना एकत्र आणून त्यांचा सत्कार गरुड शाळेच्या माजी विद्यार्थी घडवून आणला. हे विद्यार्थी व्यावसायिक, आरोग्य, शेती, राजकारण आदी विविध क्षेत्रात सध्या कार्यरत आहे. यावेळी संजय गरुड, सागरमल जैन, आबासाहेब शेळके, जी.मांडवळे, डी.के.अग्रवाल, बी.एस.जाधव, के.एस.कळस्कर, वी.वाय.सपकाळे, एस.वी.पाटील, वी.वाय.अभ्यंकर, गजानन सूर्यवंशी, रघुनाथ मस्कावदे, एस.एस.पाटील, वी.झेड.देशमुख, बी.सी.पाटील, वी.डी.पाटिल, हेमचंद्र सूर्यवंशी सीडनी आस्ट्रेलीया, प्रशांत जाधव, त्वचा रोग तज्ञ आदींची यावेळी उपस्थिती होती.