शेंदुर्णी उत्तर, दक्षिण भाग विकासो निवडणूक बिनविरोध

0

शेंदुर्णी। येथील उत्तर भाग व दक्षीण भाग विविध कार्यकारी सहकारी संस्थेची 2017 ते 2022 या कालावधीसाठीच्या संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. उत्तर भाग सोसायटीत भाजप प्रणीत पॅनेलचे तर दक्षीण भाग सोसायटीत राष्ट्रवादी कॉग्रेस प्रणीत पॅनेलचे संचालक निवडुण आले आहे. सुरुवातीला 13 जागेसाठी 32 नामांकन दाखल करण्यात आली होती. या विद्यमान संचालकांचा देखील समावेश होता. अखेर माघारीनंतर 13 नामांकन अर्ज शिल्लक राहिल्यामुळे निवडणूक अधिकारी यांनी बिनविरोध निवड घोषीत केली.

यांची झाली निवड
सर्वसाधारण गटातून कडोबा सोनजी गुजर, अर्जुन धना बारी, संजय किसन बारी, सुभाष विठोबा चौधरी, नारायण आनंदा कोळी, लक्ष्मण दौलत गुजर, सुुुभद्राबाई नारायण पाटील यांची तर महिला राखीव गटात आशा किरण बारी, पार्वताबाई शंकर शुक्ल, इतर मागासवर्गीय गटातुन प्रल्हाद आनंदा गोढरी, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात, दीपक रामदास जोहरे, भटके विमुक्त जाती जमाती मतदार संघातुन राजेंद्र धोंडूसिंग राजपूत आदींची संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

उत्तर भाग विविध कार्यकारी सोसायटी संचालक निवडीबद्दल जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.गिरीश महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, पंडित दीनदयाल पतसंस्था अध्यक्ष अमृत खलसे, उपसरपंच नारायण गुजर, उत्तम थोरात, डॉ. सुरेश ओस्तवाल, प्रकाश झंवर, टी. के. पाटील, विजय कडोबा गुजर, राजमल अग्रवाल यांनी अभिनंदन केले आहे. तर दक्षीण भाग सोसायटीत राष्ट्रवादी कॉग्रेस प्रणीत संजय गरुड यांच्या नेतृत्वाखाली संचालक बिनविरोध निवडुण आले. निवडुण आलेल्या संचालकाची राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले.