शेंदुर्णी ग्रामपंचायतीतर्फे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात

0

शेंदुर्णी । येथील समस्त गावकरी व शिवप्रेमी तालुका शिवसेना प्रमुख पंडितराव जोहरे यांच्या कडून गेल्या 35 वर्षांपासून गावांत तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे दरवर्षी 19 फेब्रुवारीला ग्रामपंचायतचे वतीने तर शिवसेना पक्षाचे नेते पंडितराव जोहरे यांच्यावतीने तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 जयंत्या साजर्‍या करण्यात येत आहेत. ग्रामपंचायत वाचनालयाजवल छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंदभाई अग्रवाल, माजी जि.प. सदस्य संजय गरूड, शिवसेना नेते पंडितराव जोहरे, अमृत खलसे, माजी सरपंच सागरमल जैन, शांताराम गुजर, पं.स.डॉ. किरण सूर्यवंशी, व नागरिकांनी केले.

गावातून काढली मिरवणूक
महाराजांचे प्रतिमेची पहुर दर्जा भोईगल्ली, खाटीक गल्ली, दत्त मंदिर चौकातून इस्लामपुरा, कोळी गल्ली, पारस चौक, महावीर मार्गाने परत पहुर दर्जात येऊन मिरवणूक विसर्जित करण्यात आली. यावेळी नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते मिरवणूक शांततेत पार पाडावी म्हणून सपोनि मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंतराव गायकवाड, शिवाजी नागवे या कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.