शेंदुर्णी ग्रामपंचायत सदस्यांची ईश्‍वरचिठ्ठीने निवड

0

शेंदुर्णी । येथील ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 6 ची महिला संवर्गासाठी पोट निवडणूक घेण्यात आली. पोटनिवडणुकीसाठी संजय गरुड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्योती सारंग मेंढे यांनी तर भाजपातर्फे देखील नामनिर्देशन दाखल करण्यात आले होते. परंतु शेंदुर्णी ग्रामपंचायत ची पंचवार्षिक निवडणूक फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होऊ घातली आहे त्यामुळे ईश्वर चिठ्ठीने निवड केली.

यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जागेवर पुन्हा ईश्वर चिठ्ठीने ज्योती मेंढे यांची निवड करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्या सरोजिनी गरुड, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड, पंचायत समिती सदस्य डॉ. किरण सूर्यवंशी, शांताराम गुजर, सुधाकर बारी, अविनाश निकम यांनी स्वागत केले